Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

मनोरंजक ट्रिक्‍स

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

तुमच्‍या पर्सनल फोटोला विंडोज आयकॉन मध्‍ये बदलण्‍याचा आश्‍चर्यकारक जलद आणि सोपा मार्ग

जून 20, 2015

तुमच्या पीसी मध्ये अनेक फोल्डर्स असतील, पण तुम्हाला नेहमी स्वतःचे पर्सनलSurprisingly Quick and Easy Way To Turn Your Personal Pictures Into Windows Icons फोल्डर इतरांपेक्षा वेगळे दिसावे अशी इच्छा असते. जर तुम्ही काही फोल्डर्सला इतरांपेक्षा वेगळा लुक देऊ इच्छित असाल तर तुमचा आवडता फोटो तुम्ही विंडोज आयकॉन म्हणून सेट करू शकता.पण प्रथम हे समजून घेऊ या कि विंडोज आयकॉन काय आहे? आयकॉन हे एक छोटे चित्र असते, जे एखादी फाइल किंवा प्रोग्रामचे प्रतिनिधित्व करते आणि त्याचे एक्सटेंशन .ico असते. यात एक इमेज असते, जी विविध आकार आणि कलर डेप्थ मध्ये असते. याचा आकार हा 48x48, 32x32, 24x24, आणि 16x16 मध्ये मोजतात.पण घाबरू नका, स्वत: च्या इमेजचा आयकॉन तयार करण्याची प्रोसेस खुप सोपी आहे. सध्या स्वतःचा आयकॉन करण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी असंख्य सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. पण ऑनलाइन टूलचा वापर करून आयकॉन तयार करणे ही सर्वात सोपी आणि जलद प्रोसेस आहे आणि यासाठी तुम्हाला कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागत नाही आणि त्यात कसे काम करावे हे शिकावे देखील लागत नाही.

खाली काही ऑनलाइन टूल्स आहेत ज्यात आयकॉन तयार आणि इडिट करता येतात -

www.converticon.com

http://www.icoconverter.com/

https://iconverticons.com/online/
नोट – आयकॉनचा आकार हा नेहमी स्क्वेअर असतो आणि म्हणून शक्यतो यासाठी इमेजसुध्दा स्क्वेअर सिलेक्ट करा. पण जर इमेज स्क्वेअर नसेल तर हि इमेज स्क्वेअर करण्यासाठी येथे रिक्त जागा रिकाम्या जागेने भरली जाईल.

तुमचा अभिप्राय लिहा: