हार्डवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

तुमच्या सिस्टिमधील सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बदद्ल जाणून घ्‍या

जानेवारी 01, 2015

पीसी वापरतांना, अशी अनेक कारणे आहेत जेव्हा तुम्हाला तुमच्या पीसी मध्ये कोणते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहेत हे शोधण्याची गरज भासते. काही वेळा तुम्हाला तुमच्या पीसी मधील प्रोसेसर, मेमरी, मदरबोर्ड चिपसेट, ग्राफिक्स आणि नेटवर्क कार्ड, इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर याविषयी महत्वाचे तपशील जाणून घ्यायचे असते. अशा परिस्थितीत सिस्टिम इन्फॉर्मेशन टूल हे उपयुक्त ठरतात.


1) Windows System Information:

विंडोंज ऑपरेटींग सिस्टिम मध्ये हे वैशिष्टय् आधिच समाविष्ट केलेले आहे, जे तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्डवेअर, कॉम्प्युटरचे कंपोनंट, सॉफ्टवेअर आणि ड्रायव्हर इ. चा तपशील दाखवतो.विंडोज 7 मध्ये स्टार्ट ला क्लिक करा आणि सर्च बॉक्स मध्ये Run टाइप करुन Enter करा. येथे msinfor32 कमांड टाइप करुन Enter केले असता सिस्टिम इन्फॉर्मेशनची विंडो ओपन होईल.

सिस्टिम इन्फॉर्मेशनच्या कॅटॅगीरीची लिस्ट डाव्या बाजूला तर यांचा तपशील उजव्या बाजूच्या पॅन मध्ये दिसतो. येथिल कॅटॅगीरीमध्ये सिस्टिमची समरी, हार्डवेअर रिसोर्सेस, कंपोनंट आणि सॉफ्टवेअर यांचा समावेश आहे.


खाली काही निशुल्क थर्ड पार्टी सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती आहे -


2) Speccy:

Piriform चा Speccy, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर उपकरणे, आवृत्ती, स्टोरेज, ग्राफिक्स, व नेटवर्क अशी सर्व माहिती उपलब्ध करुन देतो. हा आकाराने अतिशय लहान आहे.

Speccy तुमच्या सिस्टिमचा तपशील आणि सीपीयू, रॅम, मदरबोर्ड, ग्राफिक्स, स्टोरेज, ऑप्टिकल ड्राइव्ह, ऑडिओ, पेरिफेरल आणि नेटवर्क अशा इतर विस्तारीत श्रेणींचा उपलब्ध डाटा दाखवतो. याव्यतिरिक्त Speccy सिस्टिमधील विविध घटकांचे तापमानाच्या नोंदी दाखवतो, जेणेकरुन तुम्ही यातील समस्या सहजपणे जाणून घेऊ शकाल.

Speccy मध्ये तुम्ही स्कॅन रिझल्ट सरळ एका स्नॅपशॉट फाइल किंवा टेक्स्ट किंवा एक्सएमएल फाइल मध्ये स्टोअर करुन ठेऊ शकता, ज्यांचा वापर करुन टेक्नीकल सपोर्ट कडून कॉम्प्युटरमधील समस्यांचे निदान करण्यासाठी हातो.


डाउनलोड: Speccy


3) HWInfo:

HWiNFO32 ही एक उत्कृष्ट सिस्टिम इन्फॉर्मेशन आहे, जी तुमच्या कॉम्प्युटरच्या ऑपरेटींग सिस्टिम, स्टोरेजची क्षमता आणि रॅम याविषयी माहिती देते. ही अतिशय सोप्या इंटरफेस सोबत, पार्टेबल आहे.

HWiNFO32 प्रोसेसर, मदरबोर्ड, मेमरी, पण, GPU, ड्राइव्हर, ऑडिओ, नेटवर्क आणि पोर्ट यांचा समावेश असलेली संपूर्ण हार्डवेअरची यादी देते.

डाउनलोड: HWiNFOR

4) Belarc Advisor:

Belarc Advisor हा सुध्दा एक सर्वोत्तम मोफत सिस्टिम इनफॉर्मेशन टूल आहे. हा अतिशय जलद, वापरण्यास सोपा आहे आणि तुम्हाला इन्स्टॉल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, नेटवर्क इनव्हेंटरी, गहाळ मायक्रोसॉफ्ट हॉटफिक्सेस, अँटी-व्हायरसची स्थिती, सेक्युरीटी बेंचमार्क याविषयी सविस्तर माहिती देतो. हा आकाराने अतिशय लहान आहे आणि यातील रिझल्ट हे डिफॉल्ट ब्राऊझर मध्ये दिसतात.

डाउनलोड : Belarc Advisor


5) SIW:

SIW हा एक संपूर्ण, मोफत आणि प्रगत सिस्टिम इन्फॉर्मेशन टूल आहे, जो तुमचा पीसीचे विश्लेषण करतो आणि सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्क यांची सविस्तर माहिती गोळा करतो. तसेच हा रियल-टाइम सिपीयू, मेमरी, नेटवर्क ट्राफिक याविषयी माहिती दाखवतो. SIW मध्ये रिझल्ट HTML, TEXT, CSV किंवा XML फॉरमॅट मध्ये एक्सपोर्ट करण्याची सुविधा आहे.

डाउनलोड: SIW


तुमचा अभिप्राय लिहा: