Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

ज्ञानधारित प्रश्न्

प्रोसेसर आणि कोर काय आहे? प्रोसेसर मधील फरक आणि इंटेल विरूध्द एएमडी

ऑगस्ट 02, 2015

प्रत्येक पीसी आणि स्मार्टफोन मध्ये प्रोसेसर आहे आणि जेव्हा नविन पीसी किंवा स्मार्Processor_Understandingटफोन घेतांना का नेहमीचा प्रश्न आहे की "माझ्यासाठी उत्तम प्रोसेसर कोणता आहे?" आणि हे खुप महत्वाचे देखील आहे कारण हायर प्रोसेसर हा मल्टीटास्कींग कामे सहज करू शकतो आणि यात सर्व ऑपरेशन जलद गतीने होतात. म्हणूनच तुमच्यासाठी बेस्ट प्रोसेसरची निवड करण्याआधि प्रोसेसर विषयी अधिक जाणून घेऊ.


What is Processor?

निश्चीतच, प्रोसेर हा कॉम्प्यूटरचा ब्रेन आहे, ज्याला सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) किंवा मायक्रोप्रोसेसर देखील म्हणतात.कॉम्पयूटर प्रोसेसर हा कॉम्प्यूटरच्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे सर्व फंक्शन हे एका लहान छोटयाश्या इंटीग्रेटेड सर्किट (आयसी) वर समाविष्ट करतो. मायक्रोप्रोसेसर हा मल्टीपर्पज, प्रोग्रामेबल डिव्हाइस आहे जो डिजीटल डाटा इनपूट म्हणून घेतो आणि यातील मेमरीत  स्टोअर केलेल्या इंस्ट्रक्शन प्रमाणे त्यावर प्रोसेस करतो आणि आऊटपूट म्हणून रिझल्ट देतो.कॉम्पयूटर प्रोसेसच्या इतिहास बघीतला तर याच्या वेगात आणि कॅपॅसिटी मध्ये खुप सुधार झालेला आह इंटेलने पहिला मायक्रोप्रोसेसर 4-bit microprocessor 404 सन 1971 साली तयार केला. यात 2300 ट्रान्सीस्टर्स होते आणि तो साधारतः 60000 ऑपरेशन प्रति सेकंद करू शकत होता. 1970 मध्ये मायक्रोप्रोसरच्या निर्मीतीने डिजिटल सिस्टीम डिझाइन मध्ये क्रांती घडवून आणली आणि ती आज सुध्दा चालू आहे.

पूढील ग्राफ मध्ये मायक्रोप्रोसेरमध्ये कालानूरूप घडणारे बदल दर्शInfograph_Processor_Capacityवले आहे.मायक्रोप्रोसरची प्रतिवरर्षी लॉजिकल कॅपॅसिटी ही 30% ने वाढली, क्लॉक फ्रिक्वन्सी ही 20% ने वाढली पण त्याची कॉस्ट पर फंक्शन 20% ने घटली. आता एकाच मायक्रोप्रोसेरच्या चिपवर अधिका अधिक फंक्शन पॅक करता येऊ शकतात.

एका चिपवर खुप मोठया संख्यने ट्रान्सीस्टर्स बसविता येण्याच्या क्षमतेने, तेवढयाच आकाराच्या प्रोससरची कॅपॅसिटी खुप पटीने वाढविता येणे शक्य झाले आहे. याचा फायदा फास्टर अॅक्सेस आणि अनेक अॅप्लीकेशन साठी सिस्टिमचा प्रोसेसिंग स्पीट वाढविण्यात झाला आहे.

गेल्या दशकात आपल्या पीसी मध्ये आधि ड्युअल-कोर, क्वाड-कोर आणि आता Core i3 प्रोसेसर ज्यात दोन कोर आहेत, Core i5 ज्यात चार कोर आहेत आणि Core i7 ज्यात चार कोर आहेत यांचा वापर होतो. अॅडव्हांस टेक्नॉलॉजीने अधिक कॉम्प्लेक्स आणि पॉवरफूल चिप बनविणे शक्य झाले आहे आणि याचा परिणाम इंटीग्रेटेड सर्किटवरील कमी किमतीच्या कॉम्प्यूटींगने समाज आधूनिक झाला आहे.


Intel Chips timeline:

येथे मायक्रोप्रोसेसर ट्रान्झिस्टरचा एक इतिहास आहे -

Processor_History_Timeline


What Are Cores?

कोर हे साधारणतः सिपियूचे बेसिक कॉम्प्यूटेशन युनिट आहे जे ALU मधून  सुचनांचे पालन करून विशिष्ट अॅक्शन करतात. जर सिपियू मध्ये एकच कोर असेल तर याचा अर्थ यात एकच प्रोसेसिंग युनिट आहे आणि तो एकाच वेळी अनेक ऑपरेशन करू शकत नाही.याचा परफॉर्मंन्स वाढविण्यासाठी, यात अतिरिक्त कोर किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जोडले जातात. ड्युअल कोर सिपियू मध्ये एकाच सर्किटमध्ये दोन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतात जे एकच कोर म्हणून कार्य करतात. पण त्यांना त्यांचे  स्वत:चे कंट्रोलर असतात जे सिंगल कोरपेक्षा जास्त वेगाने काम करण्यास मदत करतात. ड्युअल कोर सिपियू हा सर्व अॅक्शन जलद गतीने आणि एकाच वेळी करू शकतो.Quad-Core-Processor

Difference between Processors:

"ड्युअल कोर," "क्वाड कोर," आणि "ऑक्टा कोर" हे सर्व फक्त एक CPU मध्ये असलेल्या कोरची संख्या आहे.
AMD Vs Intel:

AMD-vs-Intelपीसी किंवा लॅपटॉप खरेदी करताना Intel व AMD हे अजूनही प्रोसेसरसाठी मुख्य पर्याय आहेत. आणि हि निवड आधिक क्लिष्ट होते जेव्हा तुम्ही पीसी किंवा लॅपटॉप घेण्यासाठी ऑनलाइन किंवा रिटेल स्टोअरला भेट देता, कारण येथे Intel व AMD चे शकडो ऑप्शन तुम्हाला दिसतात.

साधारणपणे AMD प्रोसेसर त्यांच्या समकक्ष कॅपॅसिटी असलेल्या इंटेल प्रोससरच्या तुलनेत स्वस्त आहेत. जर तुम्ही बजेट मध्ये पीसी शोधत असाल तर AMD प्रोसेसर चे लॅपटॉप भरपूर आहेत.

इंटेल हा निश्चितपणे बहुतांकाचा आवडता प्रोसेसर आहे कारण त्याचा परफार्मंस हा चांगला आहे. पण कमी किमतीतील AMD हा स्वस्त आणि चांगली कामगिरी करणारा आहे.

असं असलं तरी, साधारणपणे ...

Intel_Vs_AMD
तुम्ही इंटेल किंवा AMD पैकी कोणत्या प्रोसरसची निवड करावी याचे कोणतेच योग्य उत्तर नाही कारण प्रत्येक पीसी किंवा लॅपटॉप हा गरजा आणि बजेट नुसार बनवले जातात.