इंटरनेट टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

अल्‍टीमेट गाइड जे तुमचे जीमेलचे कौशल्‍य वाढवून तुम्‍हाला एक्‍सपर्ट बनवतील

जुलै 05, 2015

हे महत्वाचे नाही की तुम्हाला आवड आहे किंवा नाही, पण ईमेल हा प्रोफेशनल आणि वैयक्तीGmail_Tips_Tricksक कम्युनिकेशनचा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच जवळपास सर्व युझर्सना त्यांच्या इनबॉक्सकडे सतत लक्ष ठेवावे लागते. यात एका वेळी अनेक टास्क समाविष्ट असतात, जसे मेल्स चेक करणे, रिप्लाय करणे, मेल मध्ये सर्च करणे आणि जर एका पेक्षा जास्त अकाउंट असतील तर ते सुध्दा चेक करणे.

पण जर तुम्ही जीमेलचे युझर असाल, तर यात अनेक कुल फिचर्स आहेत जे तुमची प्रॉडक्टीव्हीटी वाढवतात. सध्या जीमेलचे 900 मीलीयन पेक्षा जास्त युझर्स आहेत आणि ही 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून एक सर्वात लोकप्रिय सेवा आहे.परंतु अनेक युझर हे जीमेलच्या अनेक वैशिष्ट्यांबददल अवगत नाहीत, जे त्यांच्या साठी खुप फायदेशीर ठरू शकतील. येथे काही टिप्स्आणि ट्रिक्स आहेत जे तुमचे जीमेलचा अनुभव वृद्धिंगत करतील आणि तुमचा जीमेल वापरण्याची पध्दत बदलून जाईल.


1) Let Gmail prioritize your inbox:

जर Gmail_prioritize_inboxतुम्हाला दररोज खुप मेल्स येत असतील तर लवकरच तुमचा इनबॉक्स शेकडो मेल्सने भरून जाइल आणि मग यातील महत्वाचे मेल कोणते आणि कोणत्या मेलला रिप्लाय दयायचा आहे हे शोधणे खुप कठिण हाऊन जाईल.

मग अश्या वेळी Priority Inbox आपोआप महत्वाचे मेल्स ओळखण्यासाठी प्रयत्न करतो आणि इतरांपासून त्यांना वेगळे करतो. बाय डिफॉल्ट Priority Inbox हो तीन भागात विभागलेला असतो - “Important and unread,” “Starred,” आणि “Everything else.” जीमेल हुशारीने वारंवार वाचले जाणारे मेल्स निवडतो आणि त्यांना अग्रक्रम देतो. Priority Inbox हो इनबॉक्स स्टाइल मधील एक आहे आणि तुम्ही सहज या स्टाइल मध्ये स्विच करू शकता - Priority Inbox सेट करण्यासाठी -



2) Set Default Reply All:

प्रत्येकजणांना असे मेल्य येतात ज्यात अनके कॉनटॅक्ट असतात आणि वारंवार या सर्वांना रिप्लाय करावा Gmail_ReplytoAllलागतो, मग अश्या वेळेस डिफॉल्ट Reply रिप्लाय ऑप्शनला Reply All मध्ये बदलवू शकता.



3) Sign in to multiple accounts at once:

जर तुमच्या कडे एकापेक्षा जास्त जीमल अकाउंटस् असतील तर तुम्ही एकाच ब्राउझर मध्ये (ChroGmail_Add_another_accountme किंवा Firefox) multiple sign-in वापरून एका अकाउंट मधून दुस-या अकाउंट मध्ये पुन्हा पुन्हा साइन इन आणि साइन आउट न करता जाऊ शकता.

Add your Google Accounts


Switch between accounts


4) Check emails from other accounts using Gmail:

जर तुमच्या अनेक जीमेल अकाउंट असतील, तर तुम्ही हे सर्व एका जीमेल मध्ये चेक करू शकता. जीमेलचे Mail Fetcher फिचर पहिले तुमचे सर्व जुने मेल्स येथे इंपोर्ट करतो आणि नंतर नविन येणारे मेल्स तुम्ही येथे चेक करू शकता. येथे एकाच वेळी जीमेल किंवा अन्य जे POP3 ची सर्विस पुरवतात असे 5 अकाउंट अॅड करू कशता.Gmail_Add_another_account



5) Import email and contacts:

जर तुम्हाला दुस-या ईमेल सर्विस प्रोव्हाडर कडून जीमेल मध्ये स्विच करायचे असेल तर तुम्ही सहजपणे दुस-या अकाउंट मधील मेल्स आणि कॉन्टॅक्ट जीमेल मध्ये इंपोर्ट करू शकता. नविन मेल्स हे या जीमेलच्या अकाउंट मध्ये 30 दिवसापर्यंत फॉरवर्ड होत राहतील, जेणे करून या नविन ईमेल अॅड्रेस बददल इतरांना माहिती होईल.



6) Unsubscribe from Mailing Lists:

जर तुम्हाला खुप न्युजलेटर्स मिळत असतील आणि जर तुम्हाला यातून unsubscribe करायचे असेल तर या मेल्सच्या खालील बाजूला असेली unsubscribe ची एक छोटी लिंक शोधून त्यावर क्लिक करावे लागते जे खुप डोकेदूखीचे ठरते. परंतू जीमेलने हे काम खुप सोपे केलेले आहे. यासाठी मेल ओपन करा आणि वरील बाजूला असलेल्या पाठविणा-याच्या ईमेल अॅड्रेसच्या बाजूच्या unsubscribe बटनाला क्लिक करा.



7) Undo sending your mail:

जर चुकून एखादा मेल पाठवला गेला असेल तर लगेच या अॅक्शनला Undo करण्यासाठी Undo send हा ऑप्शन इनॅबल करून ठेवा.

 

टीप: जेव्हा तुम्ही एखादा मेल पाठवता तेव्हा तो डायरेक्ट सेंट न होता काही वेळ sending मध्ये असतो आणि या वेळेतच तुम्ही Undo करू शकता.


8) Gmail Offline:

Gmail_offlineजर इंटरनेट बंद असतांना सुध्दा तुम्हाला मेल्स रिड करायचे असतील, मेलला रिप्लाय करायचा असेल किंवा मेल मध्ये काही सर्च करायचे असेल तर – Gmail Offline हा ऑप्शन वापरा. हे एक अॅप आहे जे तुम्ही इंटरनेटला कनेक्ट नसतांना सुध्दा मेल्स रिड करण्याची परवानगी देते. तुम्ही मेल कंपोज सुध्दा करू शकता आणि ऑनलाइन आल्यानंतर हे मेल सेंट होतील.


9)  Last account activity:

Gmail_Last_account_activityLast account activity मेल मधील रिसेंट अॅक्टीव्हीटी बददल माहिती देते. Last account activity मध्ये कोणत्या वेळेस कोणत्या ब्राउझर मध्ये मेल अॅक्सेस केले गेले, पॉप क्लायंट, मोबाइल डिव्हाइस, थर्ड पार्टी अॅप्लीकेशन, मेल अॅक्सेस केलेले आयपी अॅड्रेस इ. समाविष्ट असतात.

पेजच्या तळाशी असलेल्या Last account activity समोरील Details बटनावर क्लिक करा.







10) Remote sign out:

जर तुम्ही पब्लीक कॉम्प्यूटर मधून साइन आऊट करण्याचे विसला असाल किंवा ज्या मोबाइल मध्ये हा जीमेल अॅड्रेस असेल तो हरवला असेल तर रिमोटली साइन आउट करता येते.



11) Essential Keyboard Shortcuts:

कीबोर्ड शॉर्टकट वापरून तुम्ही तुमचे कार्य अधिक जलद आणि सोपे करता येइल. पण हे कीबोर्ड शॉर्टकट वापरण्यापूर्वी सेटिंग्ज मध्ये कीबोर्ड शॉर्टकट इनॅबल करणे आवश्यक आहे:


Shortcut Key Definition

C - Compose

d -  Compose in a new tab

/ -  Search

k  - Move to newer conversation

` -  Go to next inbox section

~  - Go to previous inbox section

o orEnter  - Open

s  - Star a message or conversation

+ -  Mark as important

- -  Mark as unimportant

!  - Report spam

r -  Reply

a  - Reply all

f  - Forward

Esc  - Escape from input field

Ctrl + s
#  - Delete

z  - Undo