मोबाईल टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

तुमचे जीवन सुधारण्‍यासाठी गेम्‍स खेळून आणि मेंदूचा व्यायाम करुन तुमच्‍या मेंदूला ट्रेन करा

किरण पाटील | ऑक्‍टोबर 10, 2014

तुम्ही जिम मध्ये जाता आणि शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी वेळ खर्च करता, परंतु तुम्हाला कधी तुमच्या मेंदूचा व्यायामाची गरज वाटली का? तुमच्या एखादया स्नायू प्रमाणे, तुमच्या आपल्या मेंदूला देखीलनियमित व्यायाम आवश्यक आहे. मेंदूला प्रशिक्षण दिल्याने कोणत्याही वयातील लोकांना जलद विचार, उत्तम स्मृती, नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न, तीक्ष्ण दृष्टी, तीक्ष्ण ऐकणे, जलद प्रतिक्रिया आणि आत्मविश्वास असे लाभ होऊ शकतात.

तुमच्या मेंदूचा सराव करण्यासाठी बरेच पुस्तके आणि खेळ आहेत. पण कोणत्याही वेळेत आणि कोठेही तुमच्या मेंदूला प्रशिक्षण देण्यासाठी मोबाईल हा उत्तम पर्याय आहे. आता अनेक अॅप्स तुमच्या स्मृतीत आणि निर्णय क्षमते मध्ये सुधारण्याचा दावा करीत आहेत.

त्यातील काही अॅण्ड्रॉइड साठी चे अॅप्स पाहू -


1) Lumosity:

Lumosity मानसिक फिटनेस आणि मेंदू प्रशिक्षणासाठी एक व्यायामशाळाच आहे. यात वेग, स्मृती, लक्ष, लवचिकता आणि समस्या सोडवणे सारखे प्रशिक्षण विविध श्रेणींमध्ये आहे. यातील गेम्स समजून घेणे सोपे आहे आणि जेव्हा तुम्ही हे गेम्स खेळता तेव्हा आपला स्कोअर LPI (Lumosity Performance Index) ने ट्रॅक केले जातात. या LPI च्या मदतीने तुम्ही मेंदूचे सामर्थ्य आणि दुर्बलता शोधून काढू शकता. मोफत वापरकर्ते दररोज येणारे दैनिक व्यायाम मध्ये प्रवेश करु शकता तर सब्स्क्राइबर एक्सर्साइज़ आणि अजून काही वैशिष्टयांचा लाभ घेऊ शकतात.


डाउनलोड करा: गुगल प्ले


2) Fit Brains Trainer:

हा एक ऑल-इन-वन मेंदू प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे. Fit Brain तुम्हाला स्मृती, एकाग्रता, समस्या-सोडवणे आणि इतर मानसिक कौशलय प्रशिक्षणासाठी 360 पेक्षा अधिक अद्वितीय गेम्स आणि कोडी पुरवतो. तुम्ही येथे तुमच्या प्रत्येक मेंदू कौशल्यातील कामगगिरी चा आढावा घेऊ शकता.


डाउनलोड करा: गुगल प्ले



3) Brain Trainer Special:

Lumosity प्रमाणे, या अॅण्ड्रॉइड अॅप्स मध्ये विविध एक्सरसाइज आहेत, जे स्मृती, लक्ष आणि प्रक्रिया गती सुधारण्यासाठी मदत करतात. येथे डिफीकल्टी चे अनेक लेवल्स आहेत. तुमच्या मेंदूच्या प्रशिक्षणासाठी येथे ninja, save ninja, letter sequences, number sequences सारख्या अनेक मेमरी ट्रेनिंग आहेत.


डाउनलोड करा: गुगल प्ले


4) NeuroNation - brain training:

NeuroNation वर , तुम्ही तुमच्या मेंदू ची कामगिरी अनेक पटीने सुधारु शकता. NeuroNation पूर्णपणे मोफत आणि केवळ जाहिरात पुरस्कृत आहे. येथे तुमची संज्ञानात्मक क्षमता सुधारण्यासाठी पाच श्रेणी आहे. प्रत्येक प्रशिक्षण सत्रात व्यायाम व प्रशिक्षण एक संच समाविष्टीत करण्यात आला आहे. तसेच तुम्ही इतर सदस्यांसोबत तुमच्या परिणामाची तुलना करु शकता आणि त्यांना आव्हान देऊ शकता.


डाउनलोड करा: गुगल प्ले



5) Memory Trainer:

हे अॅप्लीकेशन वापरुन तुम्ही काही मानसिक व्यायम करुन स्मृती कौशल्य सुधारु शकता. यात number recall, colors and shapes, spatial recall आधि खुप काही वैशिष्टयांचा समावेश आहे. याची रचना अतिशय सुबक आहे तसेच हा वापरण्यास अतिशय सोपा आहे.


डाउनलोड करा: गुगल प्ले


मला आशा आहे हे पर्याय तुमच्या साठी ठरतील. तुमच्या मेंदू प्रशिक्षणासाठी शुभेच्छा!




तुमचा अभिप्राय लिहा: