सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

विंडोज मध्‍ये हार्ड डिस्‍कची स्‍पेस फ्री करण्‍याचे 10 मार्ग

जून 20, 2015

अव्यवस्था तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते, मग तुम्ही घरी, ऑफिसात किंवा अगदी तुमच्या कॉम्प्यूटरवर असा. काही गोष्टी क्रमाने न ठेवणे हेच एक कारण आहे कालांतराने गोंधळ निर्माण करणारे. काही कालावधीनंतर अनेक फाइल्स, प्रोग्राम्स तुमच्या कॉम्प्यूटरचे खुप बाइटस वापरतात आणि नंतर तुमच्या लक्षात येते की आता डिस्क क्लिनअप करायला हवी. पण कशी?

यासाठी नको असलेल्या फाईल्स डिलिट करणे पुरेसे नाही. तर तुम्हाला मोठया आकाराच्या फाइल्स आणि फोल्डर्स शोधून काढावे लागतील आणि सिस्टिम प्रोसेसला हानी होणार नाही याची खात्री करून ते डिलीट करावे लागेल. पण खालील काही जलद आणि सोप्या टिप्स्तुम्हाला काही पर्याय देतील हार्ड डिस्कची स्पेस फ्री करण्याचे आणि तुम्ही कधी विचार देखील केला नसेल येवढी स्पेस तुम्ही फ्री करू शकाल.


1) Analyze Disk Space:

प्रथम तanalyze_disk_spaceुम्हाला कोणत्या फाइल्स जास्त जागा व्यापत आहे याचे विश्लेषण करावे लागेल. जलद विश्लेषण करण्यासाठी आणि डिस्क क्लिनअप करण्यासाठी तुम्ही काही थर्ड पार्टी टूल्स वापरू शकता.

WinDirStat हे मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या विविध आवृत्ती मधील डिस्क वापराची आकडेवारी दाखविणारे आणि क्लिनअप टूल आहे. WinDirStat हे नक्की कोणते फोल्डर, फाइल्सचा प्रकार, फाइल्स जास्त जागा वापरत आहेत हे दाखवते. पण एखादी फाइल किंवा फोल्डर डिलीट करण्याआधी ते महत्वाचे तर नाही याची खात्री करून घ्या. तसेच तो एखादा प्रोग्राम किती जागा घेत आहे हे सुध्दा दर्शवितो आणि मग तुम्ही नको असलेले आणि जास्त जागा व्यापत असलेले प्रोग्राम्स काढून टाकू शकता.

डाउनलोड: WinDirStat


2) Uninstall Unnecessary Programs:

जर तुम्ही Uninstall Unnecessary Programsइन्स्टॉल केलेला एखादा प्रोग्राम खुप कालावधीत रन देखील केला नसेल आणि त्याचा आकार जास्त असेल तर तो अनइन्स्टॉल करून कार्ड डिस्क वरील बरीच जागा वाचवता येते. कदाचित हे प्रोग्राम फक्त ट्राय म्हणून असतील, गेम्स असतील किंवा सॉफ्टवेअरचे जुने व्हर्जन असू शकतील. अश्या वेळी हे प्रोग्राम्स अनइन्स्टॉल करण्यासाठी विंडोज मधील इनबिल्ट Programs and Features चा वापर करू शकता किंवा थर्ड पार्टी टूल CCleaner चा वापर करू शकता.


3) Clear Temporary Files:

जर तुम्हClear Temporary Filesाला तुमच्या हार्ड वरील स्पेस फ्री करण्यासाठी आणि पीसीचा वेग वाढवण्यासाठी नको असलेल्या फाईल्सची संख्या कमी करावयाची असेल तर Disk Cleanup वापरा. Disk Cleanup टेम्पररी फाईल्स काढून टाकते, नको असलेल्या सिस्टिम फाईल्स आणि इतर आयटम्स काढून टाकते, ज्यांची तुम्हाला कधी आवश्यक्ता नसते. पण Disk Cleanup टूल मध्ये फायरफॉक्स किंवा क्रोम सारख्या ब्राउझर मधील टेम्पररी फाइल्स काढण्याची क्षमता नसते, जे हार्ड डिस्क मधील खुप जागा व्यापतात. त्यामुळे अधिक आक्रमकपणे टेम्पररी फाईल्स आणि जंक फाईल्स क्लिन करण्यासाठी CCleaner वापरा.


4) Remove Duplicate Files:

तुम्हाला कRemove Duplicate Filesदाचित याची जाणिव नसेल कि, तुमच्या पीसीतील हार्ड डिस्कवरील मोल्यवान जागा डुप्लिकेट फाइल्स वाया घालवू शकतात. डुप्लिकेट फाइल्स एकाच फाईल्सच्या अनेक प्रती वेगवेगळया जागेंवर ठेवणे, फाईल्स चुकिच्या जागी ठेवणे, एका पेक्षा अनेक डाउनलोडस अश्या विविध कारणांनी तयार होतात. जरी डुप्लिकेट फाइल्स शोधून काढणे कठिण काम असले तरी सुदैवाने अनेक प्रोग्राम्स आहेत जे काही मिनिटात डुप्लिकेट फाइल्स शोधून काढू शकतात आणि डिस्क वरील भरपूर जागा रिकामी करतात. येथे काही फ्री टूल्स आहेत -

i) dupeGuru:

या कामासांठी dupeGuru हे एक ग्रेट अॅप्लिकेशन आहे. हे पुर्णपणे मोफत आहे आणि डुप्लिकेट फाइल्स शोधण्यासाठी सक्षम आहे. तसेच हे पुर्णपणे कस्टमाइझेबल आहे, जेणेकरून यातील मॅचिंग इंजिनला कोणत्या डुप्लिकेट फाइल शोधायच्या आहेत त्याप्रमाणे सेट करू शकता.

डाउनलोड: dupeGuru


ii) Awesome Duplicate Photo Finder:

कदाचित तुम्हाला तुमच्या कॅमेरा किंवा स्मार्ट फोनमधील सर्व फोटो पीसी मध्ये कॉपी करण्याची सवय असेल, पण तुम्ही त्यांना कधी क्रमवारीत लावत नसाल. याचा परिणाम अनेक डुप्लिकेट फोटो डिस्क मध्ये  अस्ताव्यस्त पडण्यात होतो. मग अश्या वेळी या डुप्लिकेट इमेजेस काढून टाकण्यासाठी तुम्हाला या टूलची गरज भासेल.Awesome Duplicate Photo Finder हे एक फ्री टूल आहे, जे तुमच्या पीसी मधील डुप्लिकेट फाइल्स शोधून काढून टाकते. या प्रोग्राम मध्ये डुप्लीकेट किंवा अगदी तत्सम इमेजेस काढून टाकण्याची क्षमता आहे.

डाउनलोड: Awesome Duplicate Photo Finder


5) Place On Other Source:

जर तुमच्Place On Other Sourceया कडे फोटो, व्हिडीओ, म्युझिक किंवा इतर फाईल्स असतील ज्या तुम्हाला उपयोगी असतील पण त्यांना अपरिहार्यपणे तुमच्या पीसी वर ठेवण्याची आवश्यक्ता नसेल तर या फाईल्स एक्सर्टनल मिडिया जसे युएसबी ड्राइव्ह, डिव्हिडी किंवा क्लाऊड स्टोरेज मध्ये ठेऊ शकता. क्लाऊड स्टोरेज हे युझरला कोणत्याही साइजची आणि कोणत्याही टाइपची फाइल अपलोड करण्याची परवानगी देतो. Google Drive, Dripbox आणि OneDrive हे काही प्रसिध्द क्लाऊड स्टोरेज आहेत. काही क्लाऊड स्टोरेज हे काही लिमिटेशन मध्ये मोफत अकाउंट देतात.


6) Compress Files or Folders:

फाइल्स आणि फोCompress Files or Foldersल्डर्स कंप्रेस करून सुध्दा हार्ड डिस्क वरील बरिच स्पेस तुम्ही वाचवू शकता. कंप्रेस फाइल्स आणि फोल्डर्स मध्ये काम करणे हे अनकंप्रेस फाइल्स आणि फोल्डर मध्ये काम करण्याइतकेच सोपे आहे. तसेच तुम्ही अनेक फाइल्स एक कंप्रेस फोल्डर मध्ये एकत्र करू शकता.फाइल किंवा फोल्डर वर राइट क्लिक करा आणि Send to हा पर्याय निवडा.नंतर Compressed (zipped) folder वर क्लिक करा.आता याच लोकेशन मध्ये एक कंप्रेस फोल्डर तयार झालेले असेल.


7) Delete Old Users Folder:

Delete Old Users Folderजर तुमच्या पीसी मध्ये जुने आउट डेटेड युझर आणि सिस्टिम फाइल्सचा बॅकअप आणि सिस्टिम इमेज असतील तर तुम्ही स्पेस फ्रि करण्यासाठी यांना डिलीट करू शकता.



जर तुम्हाला अजून हार्ड डिस्क मधील स्पेस फ्री करावयाची असेल तर खालील पर्याय वापरावेत -


8) Delete System Restore Points:

Delete System Restore Pointsसिस्टिम रिस्टोर हे विंडोज मधील एक उपयुक्त वैशिष्टय आहे. पण सिस्टिम रिस्टोर मध्ये भरपूर डेटा असू शकतो. सिस्टिम मध्ये अनेक रिस्टोर पॉइंट तयार होतात, पण तुम्ही एक-एकरिस्टोर पॉइंट डिलीट करू शकत नाही तर एकाच वेळी सर्व किंवा सर्व पण सर्वात अलीकडील रिस्टोर पॉइंट डिलीट करू शकता. हे रिस्टोर पॉइंट डिलीट करून तुम्ही तात्पूरता डिस्क फ्री करू शकता, कारण नविन रिस्टोर पॉइंट पुन्हा तयार होतात आणि डिस्क वरील जागा व्यापतात.

सर्व रिस्टोर पॉइंट डिलीट करण्यासाठी -


9) Disable Hibernation and Delete hiberfil.sys File:

Disable Hibernation and Delete hiberfil.sys Fileहायबरनेट हि एक पॉवर सेव्हिंग मोड आहे जि प्रामुख्याने लॅपटॉप साठी तयार केलेली आहे. यात ओपन असलेले कोणतेही डॉक्युमेंट किंवा प्रोग्राम मेमरी मध्ये ठेवला जातो आणि जेव्हा पॉवर फेल होते तेव्हा विंडोज तुमचे काम या मेमरीतुन रिस्टोर होते. हायबरनेट मोड hiberfil.sys फाइलचा वापर पीसीची करंट स्टेट स्टोअर करण्याठी करते. जर तुम्ही तुमचा पीसी हायबरनेट करू इच्छित नसाल तर तुम्ही हा मोड डिसॅबल करू शकता आणि hiberfil.sys फाइल डिलीट करून हार्ड डिस्क वरील स्पेस काही प्रमाण फ्री करू शकता.डिफॉल्ट hiberfil.sys (c: \ hiberfil.sys) फाइलचा आकार हा कॉम्प्यूटर वर इन्स्टॉल रॅमच्या 75% असतो.


10) Delete Windows.old Folder:

Delete Windows.old Folderजर विंडोज च्या इन्स्टॉलेशनच्या वेळी ड्राइव्ह फॉम्रॅट न करता कस्टम इन्स्टॉलेशन केले असेल तर जुन्या विंडोजच्या फाइल्स Windows.old फोल्डर मध्ये स्टोअर होतात. विंडोज इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही हे फोल्डर Disk Cleanup चा वापर करून स्पेस फ्री करण्यासाठी डिलीट करू शकता.


तुमचा अभिप्राय लिहा: