सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

विंडोज 7 मधिल 5 उपयुक्त टिप्स

किरण पाटील | सप्टेंबर 2012

जेव्हा तुमच्या समोर तुमचा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य कॉम्प्युटरवर काही तरी करतांना बघतांना तुम्हाला आलेली भावना तुम्हाला आठवतेना? जर तुम्हाला ती भावना आठवत असेल तर ती नक्कीच “जगातील उत्तम कॉम्पयुटर ज्ञान असलेली व्यक्ती“ अशीच असेल. पण जर हे ज्ञान तुमच्याकडे नसेल तर? चला ज्ञान घेऊ.


येथे आपण विंडोज 7 मध्ये असलेल्या विविध पर्यांचा अभ्यास करणार आहोत, जे तुमच्यासाठी आश्चर्यकारक असेल.

1) Recorder:

 सुरवातील कॉम्प्युटर शिकत असतांना आपणांस असंख्य अडचणी येतात आणि मग त्यासाठी आपणांस इतरांची मदत घ्यावी लागते. पण आलेला प्रॉब्लेम नेमका सांगण्याची अडचण येते आणि येथेच मायक्रोसॉफ्ट आपल्या मदतीला येते. विंडोज 7 मध्ये आपण केलेली प्रत्येक स्टेप रेकॉर्ड करु शकतो.

Steps :

  1. स्टार्ट बटनाला क्लिक केल्यानंतर सर्च मध्ये psr हे टाईप केल्यावर psr हा प्रोग्रॅम दिसु लागेल. यावर क्लिक केल्यास Problem Steps Recorder चि विंडो ओपन होईल.
  2. स्टॉर्ट बटनावर क्लिक करुन तुम्ही तुम्हाला आलेल्या प्रॉब्लेमच्या स्टेप्स पुन्हा करा. रेकॉर्डींग चालू असतांना आपण pause सुध्दा करु शकतो.    
  3. या स्टेप्स झाल्यानंतर Stops Record वर क्लिक करताच Save As ची विंडो ओपन होईल.
  4. फाईल सेव्ह करा. हि फाईल झिप फॉरमॅट मध्ये सेव्ह होईल.
  5. हि सेव्ह केलेली फाईल नंतर आपण ज्यांची मदत घ्यायची आहे त्यांना मेलने पाठऊ शकतो.

2. Burn images:

विंडोज 7 ने नविन वैशिष्टयाचा समावेश केलेला आहे आणि तो म्हणजे iso इमेज CD किंवा DVD मध्ये बर्न करु शकतो. यासाठी फक्त iso इमेजवर डबल क्लिक करा आणि blank disk असलेल्या ड्राईव्ह चा path सिलेक्ट करा नंतर Burn वर क्लिक करावे.3. Troubleshoot problems

जर विंडोज 7 मध्ये काही विचत्र घडत असेल आणि त्याचे कारण आपणांस माहित नसेल तर कंट्रोल पॅनलमध्ये जा आणि Find and fix problems वर क्लिक करा. यातीली सोप्या wizards दवारे आपण काही सामान्य प्रॉबेम्स सोडऊ शकतो.

4. Startup repair:

ऑपरेटींग सिस्टीमला काही प्रोबेम येण्यापुर्वी नेहमी system repair disc तयार करुन ठेवणे हि एक चांगली सवय आहे. यासाठी स्टार्ट मेनु मधील Maintenance वर क्लिक करुन Create a System Repair Disc वर क्लिक करावे. नंतर Windows 7 हा एक bootable emergency disc तयार करतो.

5. Pin a program to the taskbar:

एखादा प्रोग्रॅम्सचा शॉर्टकड आपण टास्कबार वर ठेऊ शकातो.जर प्रोग्रॅम आधिच चालू असेल तर, त्या प्रोग्रॅमच्या टास्कबार वरील बटनावर right click करा आणि pin this program to taskbar या पर्यायाला क्लिक करा.आणि जर प्रोग्रॅम चालू नसेल तर Start बटनाला क्लिक करुन त्या प्रोग्रॅम आयकॉन वर right click करुन pin to task bar वर क्लिक करावे.किंवा त्या प्रोग्रॅमचा आयकॉन टास्कबार वर ड्रॅग करावा.


मित्रांनो वरील विंडोज 7 च्या टिप्स तुम्हाला कश्या वाटल्या? तुम्हाला अजुन काही उपयुक्त टिप्स माहिती असतील तर आम्हाला जरुर कळवा.तुमचा अभिप्राय लिहा: