Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

फास्ट आणि नेक्स्ट-जनरेशन विंडोज सर्च आणि प्रॉडक्टींव्हीटी टूल – फ्री मध्ये

जून 30, 2015विंडोज मध्ये एक इनबिल्ट फीचर आहे ज्यात कोणतीही फाइल, फोल्डर किंवा एक्सटLookeen_searchेंशन सर्च करता येते, पण ब-याच युझरची तक्रार आहे की हे खुप वेळ घेणारे आहे आणि वापरण्यास सुलभ नाही. अनेक सर्वेक्षणांत हे दिसून आले आहे की, हार्ड ड्राइव्ह वरील फाइल्स आणि ई-मेल इनबॉक्स मधील डॉक्यूमेंटस् शोधण्यात खुप वेळ वाया जातो आणि याचा परिणाम त्यांच्या प्रॉडक्टीव्हीटी वर होतो. जर तुम्हाला खुप कमी कालावधील खुप मोठया डेटा मधून फाइल सर्च करावी लागत असेल तर Lookeen Fee तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

lookeen_overview

Lookeen Fee हे इंडेक्स बेस विंडोज डेस्कटॉप सर्च टूल आहे, जे हार्ड ड्राइव्हवर कोठेही सेव्ह केलेला डेटा सर्च करतो. Lookeen मध्ये महत्वाच्या फोल्डर किंवा ड्राइव्हला इंडेक्स केल्यानंतर एकाच वेळी ऑफिस डॉक्यूमेंट मधील कंटेट (.xlsx, .docx, .pptx इ), पीडीएफ फाइल, HTML किंवा PHP सारखे वेब कंटेंट किंवा अजून खूप काही सर्च करता येते. सर्च रिझल्ट प्रिव्हू विंडो मध्ये डॉक्यूमेंटचा प्रिव्हू सहज बघता येतो. सर्च करीत असलेला शब्द किंवा फिल्टर हे या प्रिव्हू विंडो मध्ये वेगळया रंगाने हायलाइट होते. Lookeen मध्ये फिल्टर्स आणि अॅडव्हांस सर्च क्युरीची विस्तृत रेंज आहे. (उदा. date ranges / wildcards / from: / to: / ~ / and)

हा प्रोग्राम इन्स्टॉल केल्यानंतर, याला दोनदा CTRL कि प्रेस करून किंवा टास्कबार मेनू वापरून अॅक्सेस करता येते. नंतर सिलेक्ट केलेल्या फोल्डर्स किंवा ड्राइव्हच्या डाटावर यात लागणारा इंडेक्सींगचा वेळ अवलंबून असतो. सर्च रिझल्ट अपडेट राहण्यासाठी रिअल टाइम इंडेक्सींग हे बॅकग्राउंड मध्ये सुरू राहते.


यातील Option मेनू Lookeen ने डाटा सोबत कसे काम केले पाहिजे हे कॉन्फीगर आणि कस्टमाइज करता येते. येथे कोणते फोल्डर इंडेक्स करावयाचे आहे, इंडेक्सचे शयेडूल, इंडेक्स चे डिटेल्स इ. सेट करता येतात.

Lookeen Free मध्ये मायक्रोसॉफ्ट आउटलूक मधील डॉक्यूमेंटसचा आणि नेटवर्क ड्राइव्ह मधील डेटाचा सर्च करणे यासारख्या काही गोष्टी नाहीत. तरी पण Lookeen Free हे तुमच्या साठी एक परिपूर्ण डेस्क्टॉप सर्च सोल्यूशन आहे आणि हे विंडोज डेस्क्टॉप सर्च साठी उत्तम पर्याय आहे.

डाऊनलोड करा: Lookeen Free (http://free.lookeen.com/download.html)

तुमचा अभिप्राय लिहा: